जाने. फेब्रु. मार्च. एप्रिल २३

कवी आणि संपादक पुरुषोत्तम पाटील यांच्या स्मरणार्थ काव्य, काव्यविचार, काव्यसमीक्षा व कविविमर्श यांना वाहिलेले द्वैमासिक.

नोव्हेंबर-डिसेंबर २२

कवी आणि संपादक पुरुषोत्तम पाटील यांच्या स्मरणार्थ काव्य, काव्यविचार, काव्यसमीक्षा व कविविमर्श यांना वाहिलेले द्वैमासिक.

कविता-रतीविषयी

1982 मध्ये सत्यकथेचा अस्त झाला. लघुनियकालिकं फार मोठा पल्ला गाठू शकली नाहीत. विशिष्ट कवी आणि विशिष्ट काव्यजाणिवा यांच्यापुरती ती मर्यादित राहिली. दलित साहित्याचं व्यासपीठ म्हणून अस्मितादर्श’ या काळात जोमानं कार्य करत होतं. अनुष्टुभची पायाभरणी सुरू होती. आलोचनानं समीक्षेसाठी मौलिक कार्य करण्याची भूमिका आखून घेतली होती. अशा परिस्थितीत नव्या काव्योर्मीना बळ पुरवणा-या नियतकालिकाचा अभाव जाणवत होता. हे जाणून पुरुषोत्तम पाटील यांनी धुळ्याहून कविता- रतीचा आरंभ केला.
कविता-रतीचा पहिला अंक 30 नोव्हेंबर 1985 रोजी प्रसिद्ध झाला. हा मराठी साहित्याच्या विस्ताराचा काळ होता. स्वातंत्र्योत्तर काळात उपलब्ध झालेल्या शिक्षणाच्या संधीमुळे बहुजनदलित व स्त्रिया अशा समाजाच्या विविध स्तरांमधून अभिव्यक्ती आकांक्षांचा रेटा वाढत चालला होता. त्यातूनच दलितग्रामीण आणि स्त्रीवादी या वाङ्मयप्रवाहांचा उदय या काळात झाला. आजवर मराठी वाङ्मयविश्वाच्या परिघात समाविष्ट होऊ न शकलेली मनं व्यक्त होण्याची धडपड करू लागली. त्यातील बहुतेकांची पहिली अभिव्यक्ती कविता हीच होती. समाजाच्या विविधांगांतून अनेक कवी या सुमारास पुढे येत होते. मात्र त्यांच्या कवितेला वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी पुरेसं समर्थ माध्यम या काळात उपलब्ध नव्हतं. ती कमतरता कविता-रतीनं भरून काढली.

ताजा अंक – सप्टेंबर २०२३

मागील अंक

मे – जुन 2023

नोव्हे.- डिसें २२

दिवाळी २०२२

वाचकांच्या निवडक प्रतिक्रिया

“कविता-रती” एका युगाचा काव्यखंड साहित्य साधनेतूनच भाषेचा विकास

– इंद्रजित भालेराव

कवितेचा आणि पर्यायाने मानवी जीवनातला ‘अर्थ’ कायम रहावा म्हणून ’कविता-रती’ चे अर्थशास्त्र कु्ठल्याही शासकीय अनुदानाच्या कुबड्याविना आपल्या निवृत्त खांद्यांवर त्यांनी समर्थपणे पेलले.

– श्रीकृष्ण राऊत

केवळ कविता आणि कवी यांच्याविषयीची चर्चा
एवढय़ापुरते आपले क्षेत्र मर्यादित न ठेवता पुपांनी अनेक नव्या कवींना कविता-रतीद्वारे हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले.

– विद्याविलास पाठक

‘कविता-रती’चा गाडा हाकणारे पुरुषोत्तम पाटील (धुळेकरांचे पुपाजी) स्वत: जातिवंत कवी आहेत. ‘अनुष्टुभ’ या नियतकालिकाच्या जडणघडणीच्या काळातील संपादनाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.

– संजय झेंडे