कविता-रतीविषयी

कविता- रतीचा पहिला अंक 30 नोव्हेंबर 1985 रोजी प्रसिद्ध झाला. हा मराठी साहित्याच्या विस्ताराचा काळ होता. स्वातंत्र्योत्तर काळात उपलब्ध झालेल्या शिक्षणाच्या संधीमुळे बहुजनदलित व स्त्रिया अशा समाजाच्या विविध स्तरांमधून अभिव्यक्ती आकांक्षांचा रेटा वाढत चालला होता. त्यातूनच दलितग्रामीण आणि स्त्रीवादी या वाङ्मयप्रवाहांचा उदय या काळात झाला. आजवर मराठी वाङ्मयविश्वाच्या परिघात समाविष्ट होऊ न शकलेली मनं व्यक्त होण्याची धडपड करू लागली. त्यातील बहुतेकांची पहिली अभिव्यक्ती कविता हीच होती. समाजाच्या विविधांगांतून अनेक कवी या सुमारास पुढे येत होते. मात्र त्यांच्या कवितेला वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी पुरेसं समर्थ माध्यम या काळात उपलब्ध नव्हतं. ती कमतरता कविता-रतीनं भरून काढली.

1982 मध्ये सत्यकथेचा अस्त झाला. लघुनियकालिकं फार मोठा पल्ला गाठू शकली नाहीत. विशिष्ट कवी आणि विशिष्ट काव्यजाणिवा यांच्यापुरती ती मर्यादित राहिली. दलित साहित्याचं व्यासपीठ म्हणून अस्मितादर्श’ या काळात जोमानं कार्य करत होतं. अनुष्टुभची पायाभरणी सुरू होती. आलोचनानं समीक्षेसाठी मौलिक कार्य करण्याची भूमिका आखून घेतली होती. अशा परिस्थितीत नव्या काव्योर्मीना बळ पुरवणा-या नियतकालिकाचा अभाव जाणवत होता. हे जाणून पुरुषोत्तम पाटील यांनी धुळ्याहून कविता- रतीचा आरंभ केला.
कविता-रतीचा पहिला अंक 30 नोव्हेंबर 1985 रोजी प्रसिद्ध झाला. हा मराठी साहित्याच्या विस्ताराचा काळ होता. स्वातंत्र्योत्तर काळात उपलब्ध झालेल्या शिक्षणाच्या संधीमुळे बहुजनदलित व स्त्रिया अशा समाजाच्या विविध स्तरांमधून अभिव्यक्ती आकांक्षांचा रेटा वाढत चालला होता. त्यातूनच दलितग्रामीण आणि स्त्रीवादी या वाङ्मयप्रवाहांचा उदय या काळात झाला. आजवर मराठी वाङ्मयविश्वाच्या परिघात समाविष्ट होऊ न शकलेली मनं व्यक्त होण्याची धडपड करू लागली. त्यातील बहुतेकांची पहिली अभिव्यक्ती कविता हीच होती. समाजाच्या विविधांगांतून अनेक कवी या सुमारास पुढे येत होते. मात्र त्यांच्या कवितेला वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी पुरेसं समर्थ माध्यम या काळात उपलब्ध नव्हतं. ती कमतरता कविता-रतीनं भरून काढली.
पुरुषोत्तम पाटील हे स्वत: कवी असल्यानं त्यांच्या मनात कवितेसाठी काहीतरी करण्याची ऊर्मी होतीच. शिवाय अनुष्टुभच्या संपादनाचा अनुभव गाठीशी होता. या भांडवलावर केवळ काव्य आणि काव्यसमीक्षा’ यांना वाहिलेल्या नियतकालिकाला त्यांनी प्रारंभ केला. वाङ्मयीन नियतकालिकाचा डोलारा सांभाळताना करावी लागणारी सर्वप्रकारची कसरत ते आजतागायत करत आहेत. कविता- रतीसाठी कोणत्याही प्रकारची शासकीय मदत वा अनुदान त्यांनी घेतलेलं नाही. वर्गणीदार आणि असंख्य हितचिंतक यांच्या बळावर हे नियतकालिक सुरू आहे.
शिवाय धुळ्यासारख्या महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यातील गावातून हे नियतकालिक चालवताना अनेक समस्यांना सामारं जावं लागलं. लेखनिककारकूनमुद्रितशोधकशिपाई आणि पाकिटांना तिकिटं लावणंअंक पाकिटात घालून टपालात पाठवणं अशी सर्व प्रकारची कामं ते स्वत:च करत आले आहेत. मधल्या 1993 ते 1996 या काळात कविता- रतीवर संकट कोसळलं. काही अंक प्रकाशित होऊ शकले नाहीत. अंकांच्या प्रकाशनात अनियमितता आलीपण त्यातूनही कविता- रती’ सावरलं. पुरुषोत्तम पाटील यांनी नेटानं आणि निष्ठेनं केलेली वाटचाल आज पंचवीस वर्षाची झालेली आहे.
पुरुषोत्तम पाटील हे स्वत: सौंदर्यवादी जाणीवेचे कवी आहेतपरंतु कविता- रतीचं संपादन करताना त्यांनी काव्यविषयक खुला आणि व्यापक दृष्टिकोन स्वीकारलेला आहे. कोणत्याही विशिष्ट काव्यविषयक भूमिकेशी वा संप्रदायाशी बांधून न घेता कवितेचं कवितापण’ महत्त्वाचं मानणारी भूमिका त्यांनी स्वीकारलेली आहे. त्यामुळे मराठीतले सर्व प्रवाहगटतटसंप्रदायप्रस्थापितबंडखोरनवोदित अशा सर्वाना सामावून घेण्याचं काम कविता-रतीनं केलं आहे. फक्त चांगल्या आणि चांगल्याच कविता हाच एकमेव निकष मानल्यानं तमाम मराठी कवींचे आग्रह-दुराग्रह इथं गळून पडतात. कविता-रतीमध्ये आपली कविता छापून यावी असं सर्वच कवींना वाटतं. छापून आलेल्या कवितेचं भूषण वाटतं. त्यामुळे कवितेच्या प्रांतात एक निकोप आणि चैतन्यमय वातावरण निर्माण करण्याचा कविता-रतीचा प्रयत्न अतिशय स्तुत्य म्हणावा असाच आहे. कुठलाही दावा न करता आणि कुठलीही भूमिका न घेता पुरुषोत्तम पाटील यांनी कविता-रतीच्या माध्यमातून एका साहित्यिक चळवळीची उभारणी केली आहे. आणि तीही एकटय़ाच्या बळावर!
द. भा. धामणस्कररजनी परुळेकरनारायण कुलकर्णी- कवठेकरवसंत पाटणकरनिरंजन उजगरेफ. मुं. शिंदेअनुराधा पाटीलखलील मोमीननीळकंठ महाजनअरुणा ढेरेशैला सायनाकरइंद्रजित भालेरावप्रियदर्शन पोतदारदासू वैद्यअशोक कोतवालप्रकाश विठ्ठल किनगावकरकेशव सखाराम देशमुखसुहास जेवळीकरश्रीकांत देशमुखरेणू दांडेकरप्रवीण बांदेकरहेमंत दिवटेव्रजेश सोळंकीविरधवल परबमंगेश नारायणराव काळेऐश्वर्य पाटेकरसंतोष पद्माकर पवारगणेश दिसपुतेप्रज्ञा दया पवारआदी गेल्या तीन दशकांत नावारूपास आलेल्या कवींनी कविता- रती’ मधून हजेरी लावली आहे.
कविता- रतीतून आलेले काव्यसमीक्षात्मक लेखनही वैशिष्टय़पूर्ण आहे. त्यात कवितासंग्रहांची परीक्षणंकविविमर्शात्मक लेखकाव्यविषयक चर्चा आणि कवितांची मर्मग्रहणे या प्रकारच्या लेखनाचा प्रामुख्यानं समावेश होतो. नवोदित कवींच्या पहिल्याच संग्रहाचं परीक्षण देण्यावर कविता- रतीनं भर दिला आहे. कवितांची आकलनंआस्वाद या धर्तीचं कविता- रतीतून आलेलं लेखन वैशिष्टय़पूर्ण ठरतं. कवितेच्या आशयरूप आणि भाषिक या तिन्ही अंगांचा वेध घेणारी ही समीक्षा आहे. बहुविध जाणिवांच्या चांगल्या कवितेसोबतच मर्मग्राही काव्यसमीक्षा देऊन कविता-रतीनं मराठी काव्यसंस्कृतीला व्यापकतेप्रमाणेच सबोलतेचंही परिमाण प्राप्त करून दिलं आहे. त्यात विशेषांकांनी मौलिक भर घातली आहे. आजपर्यंत एकूण तेरा विशेषांक प्रकाशित केलेले आहेत. कुसुमाग्रजबालकवीवा. रा. कान्तइंदिरा संतबा. भ. बोरकरविंदा करंदीकर या कवींच्या काव्यावरील चिकित्सक लेखनाने संपन्न असणारे विशेषांक जसे आहेततसेच म. सु. पाटीलरा. ग. जाधव या काव्यसमीक्षकांच्या लेखनाची मीमांसा करणारे विशेषांकदेखील कविता- रतीनं प्रसिद्ध केलेले आहेत. मराठी काव्यसमीक्षेची समृद्धता वृद्धिंगत करण्यासाठी कविता- रतीनं उचललेला वाटा मोलाचा आहे.
आपलं संपूर्ण आयुष्य कवितेसाठी समर्पित करून वयाच्या 83व्या वर्षीही कवितेच्या ध्यासानं अस्वस्थ असलेल्या संपादक पुरुषोत्तम पाटील यांनी आधुनिक मराठी कवितेच्या गेल्या पाव शतकाच्या वाटचालीत कविता- रतीच्या रूपानं ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. वैयक्तिक पातळीवर केल्या जाणाऱ्या कामालाही चळवळीचं रूप कसं येऊ शकतंयाचा जणू आदर्शच त्यांनी उभा केला आहे.
आज एकविसाव्या शतकातमाध्यमांच्या गर्दीत कवितेला प्राप्त होणारं बाजारूपणगटातटांच्या संकुचित चौकटीत अडकून पडलेली कविताप्रसिद्धी व यश यांच्या हव्यासापायी काव्यसाधनेचा वाढता अभावहे सारं भोवतालचं वास्तव अस्वस्थ करणारं आहे. अशा पर्यावरणात कवितेसंबंधी खुलाव्यापक दृष्टिकोन स्वीकारून कार्य करणारं कविता- रतीसारखं नियतकालिक अपरिहार्य आणि अनिवार्य आहे.

पुरुषोत्तम पाटील

संस्‍थापक संपादक

‘कविता-रती’ पहिला अंक प्रकाशन कार्यक्रम

वर्गणीदारांचा अप्रामाणिकपणा घायाळ करणारा आहे” : पुरुषोत्तम पाटील

(अक्षरनामावर प्रसिद्ध झालेली पुरुषोत्तम पाटील यांची मुलाखत)